Ad will apear here
Next
जाणून घेऊ या योगासने : वक्रासन
वक्रासन : वक्रासन हे बसून करावयाचे आसन आहे. ‘वक्र’ हा संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ ‘वाकडा’ असा होतो. हे आसन केल्यामुळे पाठीच्या कण्याला आराम मिळतो. 

असे करावे हे आसन : 
दोन्ही पाय सरळ पुढे पसरवून बसावे. दोन्ही हात बगलेत ठेवावेत. तसेच ताठ बसून नजर समोर ठेवावी. उजवा पाय हळूहळू गुडघ्याकडे वळवावा. तो वळवताना डावा पाय गुडघ्यापासून अगदी सरळ ठेवावा. नंतर उजवा हात मागे घेऊन, पाठीच्या कण्याला समांतर होईल, असा ठेवावा. थोड्या वेळानंतर डावा पाय गुडघ्याकडे वळवून घ्यावा. ही आसनाची पूर्ण स्थिती आहे. त्यानंतर डाव्या हाताला उजव्या पायाच्या गुडघ्याकडे वाकडे करून जमिनीवर ठेवावा. नंतर मान हळूहळू मागच्या बाजूला वळवत जाऊन पूर्णपणे मागे पाहण्याचा प्रयत्न करावा. 

घ्यावयाची काळजी : 
उजवा पाय गुडघ्यात वळवताना डावा पाय सरळ ठेवणे आवश्यक आहे. मागे ठेवलेला हात काखेपासून सरळ ठेवत पाठीच्या कण्यापासून सहा ते नऊ इंचाच्या दरम्यान ठेवावा. पोट आणि कंबर यांचे आजार असलेल्यांनी योग च‍िकित्सक अथवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आसनाचे फायदे : 
वक्रासन केल्यामुळे किडनी, मूत्रपिंड निरोगी राहून, त्यांचे काही आजार असतील, तर ते बरे होण्यासही मदत होते. शरीर निरोगी राहण्यास मदत होते. मानेची दुखणीही बरी होतात.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZXSCL
Similar Posts
जाणून घेऊ या प्राणायाम : कपालभाती कपालभाती प्राणायाम : कपाल म्हणजे कपाळ; भाती म्हणजे तेजस्वी किंवा ओजस्वी. म्हणजेच कपालभाती म्हणजे तेजस्वी कपाळ. कपालभाती हा प्राणायाम करताना शरीरातील सर्व संस्थांची सफाई म्हणजेच प्रक्षालन होते. ओजस्वी कपाळ हे उत्तम आरोग्याचे प्रतिक म्हणता येईल. ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामुळे केवळ वजन कमी होते, असे नाही, तर संपूर्ण शरीर संतुलित राहते
जाणून घेऊ या योगासने : चालन क्रिया सध्या संचारबंदी असल्याने अनेक जणांना भरपूर मोकळा वेळ हाताशी मिळाला आहे. या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे काही उपक्रम करतो आहे. व्यायाम, योगासने, प्राणायाम करण्याची इच्छा असूनही, सुरुवात करण्याची सवड मिळत नसलेल्यांना ही सवय अंगी बाणवण्यासाठी हा कालावधी उपयोगात आणता येऊ शकेल. म्हणूनच
जाणून घेऊ या योगासने : पवनमुक्तासन एखाद्याचा मेंदू आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती ऐश्वर्यसंपन्न असते, असे म्हणतात. थोडक्यात, एखाद्याचे मन शांत असेल आणि पोट निरोगी असेल, तर ती व्यक्ती तंदुरुस्त आणि समाधानी असते. हे दोन्हींही संलग्न असल्याने पचनसंस्था निरोगी आणि मजबूत असणे गरजेचे आहे. पोटातील वायू सरण्यासाठी आणि पचन ठीक होण्यासाठी पवनमुक्तासन लाभदायी ठरते
जाणून घेऊ या योगासने : भद्रासन भद्रासन : धावपळीच्या जीवनात आरोग्यााची काळजी घेतली, तरी मनाची, बुद्धीचीही काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी योगासनांत विशेष आसनांचा अभ्यास करता येईल. बुद्धीची सक्रियता वाढवून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी भद्रासन करणे उपयुक्त ठरते. माहिती घेण्यासाठी व व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language